Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : 6 मार्चला होणार अध्यक्ष निवड; ‘त्यांनी लावली आहे जोरात फिल्डिंग

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संचालक मंडळाची निवड फायनल झालेली आहे. त्यानंतर आता या महत्वाच्या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी यंदाही जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.

Advertisement

दि. ६ मार्च २०२१ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदासाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या सूचनेनुसार सर्व संचालकांना सभेची विषयपत्रिका पाठवण्यात आलेली आहे.

Advertisement

त्यामुळेच या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बँकेच्या अध्यक्षपदी संधी मिळण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी फिल्डिंग लावल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

सध्या या बँकेत महाविकास आघाडीकडे १५ आणि भाजपकडे म्हणजे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गटाकडे फ़क़्त ६ इतकेच संख्याबळ आहे. त्यातही कर्डिले यांचा सावतासुभा कायम आहे. त्यामुळेच कर्डिले हे दोन्ही गटाकडून सहमतीचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा दावा नगर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी केला आहे. एकूणच यंदाच्या निवडीसाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply