Take a fresh look at your lifestyle.

नगरकरांनो सावधान : एका दिवसात 6 मृत्यू; ‘अशी’ आहे कोरोना परिस्थिती

अहमदनगर :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज 8 हजारून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने आपली मान वर काढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

Advertisement

अशातच नगरकरांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात करोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  तर एका आठवड्यात तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Advertisement

नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली असली तरी मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे असल्याने आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. अहमदनगरमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असली तरी नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. 

Advertisement

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री शहरातील बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply