Take a fresh look at your lifestyle.

‘राज’ यांच्या भेटीला ‘राजे’; ‘त्या’ विषयावर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई :

Advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एका भाजप नेते राज यांच्या भेटीला गेले आहेत.

Advertisement

भाजप नेते व खासदार उदयनराजे भोसले हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी ‘कृष्णकुंज’वर पोहोचले आहेत. उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी 5 वाजता कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. 

Advertisement

मधल्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील मनसेसोबत युती करण्याची तयारी दाखवली होती. फक्त त्याला एक अटही घातली होती. आता शिवसेनेसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply