दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. 12 दिवस सलग इंधन दरवाढ झाल्यानंतर दरवाढ थांबली होती. मात्र आता पुन्हा इंधन वाढ झाली आहे.
या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहे. इंधन दरवाढ कधी थांबणार, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलं आहे.
सध्या हिवाळा असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात असे होतच असते. हिवाळा संपल्यानंतर किमती पुन्हा खाली उतरतील, असे अजब गजब विधान प्रधान यांनी केले आहे. एका जबाबदार मंत्र्यांनी केलेल्या या लॉजिक नसणार्या केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर परिणाम झालाय. जेव्हा हिवाळा संपेल तेव्हा किमती देखील खाली येतील. वाढत्या मागणीमुळे हिवाळ्यात किमती गगनाला भिडल्या आहेत. येत्या काही दिवसांत किमती कमी होतील.
आपण किमती वाढवू शकत नाही, कारण त्याचा परिणाम आयात देशांवर होतो. खराब हवामानामुळे अमेरिकेतील उत्पादन गेल्या दोन-तीन आठवड्यांत मंदावले आहे, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष