Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीचे ‘हे’ मंत्री स्पष्टच बोलले; महाराष्ट्रात लॉकडाउन होणार?

पुणे :

Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेननं शिरकाव केला आहे. हा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेकही वाढला आहे. गेल्या आठवडय़ात नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये रुग्ण वाढले होते.

Advertisement

गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नगर, जळगाव, नागपूर, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. रोजच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी रुग्णसंख्येत अडीच हजारांनी वाढ झाली आहे. अशातच आता लॉकडाउन होणार असल्याच्या शक्यता लोकांमध्ये बोलून दाखवल्या जात आहेत.

Advertisement

आता महाविकास आघाडीचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉकडाउनवर स्पष्ट भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे’, असे भरणे यांनी सांगितले.

Advertisement

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी यावेळी नमूद केले. लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक जण शेतकऱ्यांची पिळवणूक करतात, त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, पण लोकांनीही कोरोनाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे म्हणाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply