Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळतेय सर्वात जास्त व्याज; टॅक्समध्येही मिळणार सूट

पुणे :

Advertisement

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमबद्दल बोलायचे असल्यास पोस्ट ऑफिसची विशेष योजना सुकन्या समृद्धि योजना अजूनही अव्वल स्थानी आहे. ही योजना अजूनही सर्वात जास्त रिटर्न देते. सुकन्या समृद्धि योजना (SSY) वर वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळणार आहे.

Advertisement

फिक्स्ड डिपॉजि​ट (FD), राष्ट्रीय बचत पत्र (NSC), मंथली इनकम स्कीम (MIS), किसान विकास पत्र (KVP) किंवा रेकरिंग डिपॉजिट (RD) या सर्वात जास्त व्याज सुकन्या समृद्धि योजनेला मिळते. या योजनेंतर्गत आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खाती उघडता येतील. एसएसवाय मध्ये, पालक दहा वर्षांच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात.

Advertisement

या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर एकच खाते उघडले जाईल. SSY खाते किमान 250 रुपयांपासून सुरू होऊ शकते. यामध्ये आर्थिक वर्षात किमान अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये ठेव निश्चित करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

Advertisement

मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतरच सुकन्या समृद्धि खाते बंद केले जाऊ शकते. SSY मध्ये जमा केलेल्या रकमेवर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. याशिवाय मुदतपूर्तीची मुदत पूर्ण झाल्यावर ठेवीवरील व्याज आणि मिळणारे पैसे देखील करमुक्त असतात. अशा प्रकारे एसएसवाय ही ‘EEE’ प्रवर्गाची कर बचत योजना आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply