Take a fresh look at your lifestyle.

वेळेवर जेवण न करण्याचे आहेत अनेक तोटे; भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

आरोग्य आपल्यासाठी असते, आयुष्य आपल्यासाठी असते. मात्र आपण आजकाल यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हपापलेले असतो. ज्यामुळे आपण आरोग्याकडे रीतसर दुर्लक्ष केलेले असते. अगदी आपण जेवणसुद्धा वेळेवर करत नाहीत.

Advertisement

आपल्या बदलत्या जीवनशैलीत व्यायामाला, आहाराला फारसे महत्व उरलेले नाही, अर्थात कोरोनामुळे लोकांनी आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. व्यायाम न करण्याचे तोटे सर्वाना माहिती आहे. पण वेळेवर जेवण न करण्याचे गंभीर परिणाम होतात हे आपल्याला माहिती आहे का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वेळेवर जेवण न करण्याचे तोटे सांगणार आहोत.  

Advertisement
  • ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.
  • भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो.
  • वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामुळे फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.
  • वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात.
  • योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा.
  • भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.
  • भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply