Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बँकेत खाते असल्यास स्वस्तात मिळणार पेट्रोल; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. 12 दिवस सलग इंधन दरवाढ झाल्यानंतर दरवाढ थांबली होती.

Advertisement

आता आज पुन्हा इंधनदरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. मात्र आता या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी काही पर्याय आपल्यासमोर आले आहेत.

Advertisement

तुमचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी डिस्काउंट मिळू शकते. स्टेट बँक आणि इंडियन ऑईल यांनी एकत्रितपणे RuPay डेबिट कार्ड लाँच केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी या कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना लाभ मिळू शकतो.

Advertisement
  1. तुम्ही गाडीत जेवढ्या किंमतीचे पेट्रोल किंवा डिझेल भराल त्याच्या 0.75 टक्के रिवॉर्ड पॉईंट तुम्हाला मिळतील. 
  2. BPCL SBI Card Octane  या क्रेडिट कार्डमुळे भारत पेट्रोलियमचे इंधन , मॅक ल्युब्रिकन्ट, भारत गॅस (LPG) यासारख्या सुविधांसाठी संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून खर्च केल्यास 25 रिवार्ड पॉईंटस मिळतात.
  3. BPCL च्या पेट्रोल पंपावर इंधन किंवा ल्युब्रिकन्टसाठी खर्च केल्यास 7.25 टक्के कॅशबॅक आणि भारत गॅसच्या सुविधेसाठी खर्च झाल्यास 6.25 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळेल.
  4. यंदाच्या वर्षात एसबीआय कार्डसने IPOच्या माध्यमातून 10.355 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply