Take a fresh look at your lifestyle.

कोणत्या पदावर कार्यरत होते किशोर वाघ; का झाले होते निलंबीत; वाचा, संपूर्ण प्रकरण थोडक्यात

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. मात्र संजय राठोड यांच्याविरोधातील आक्रमकपणा चित्रा वाघ यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे.

Advertisement

कारण बेहिशेबीम मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलीसही तपास करत आहेत. याप्रकरणात चित्रा वाघ पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोण आहेत किशोर वाघ :-

Advertisement

किशोर वाघ हे भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती आहेत. ते मुंबईतील परेल याठिकाणी असणाऱ्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते.

Advertisement

काय आहे लाच प्रकरण :-

Advertisement

दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच दिनांक 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.

Advertisement

काय आहे गुन्हा :-

Advertisement

या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1)E या कलमांतर्गत दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply