Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून’ राज ठाकरेंना कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही; ‘या’ मंत्र्यांचा इशारा

मुंबई :

Advertisement

अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिसून आले आहेत. ते आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला विनामास्क उपस्थित होते. 

Advertisement

यावरून त्यांना पत्रकारांनी तुम्ही मास्क परिधान केला नाही असा सवाल केला. यावर उत्तर देताना मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं. 

Advertisement

याच पार्श्वभूमीवर ‘राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही’, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Advertisement

दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply