Take a fresh look at your lifestyle.

गुन्हा दाखल : ज्यासाठी सोडली होती राष्ट्रवादी; ‘त्याच’ प्रकरणामुळे चित्रा वाघ गोत्यात?

मुंबई :

Advertisement

2 दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिस दबावाखाली असल्याचे आरोप करत पुजा चव्हाणने जिथे आत्महत्या केली होती, त्या स्पॉटला भेट दिली. तसेच पोलिस स्टेशनला जाऊन तिथेही प्रश्न उपस्थित केले.

Advertisement

वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तसेच महाविकास आघाडीविरुद्ध सातत्याने आक्रमक भूमिका घेणार्‍या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Advertisement

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांचे पती किशोर वाघ यांकयावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात किशोर वाघ यांच्या विरोधात काही माहिती मिळाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

किशोर वाघ यांच्याकडं असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.

Advertisement

विधानसभेच्या दरम्यान अनेक नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करत होती. दरम्यान भाजपवर सातत्याने टीका करणार्‍या चित्रा वाघ यांनीही अचानक राजीनामा दिला. या राजीनाम्याच्या चर्चा होऊ लागल्या.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्यांनी पक्ष सोडल्याचे म्हटले जाऊ लागले मात्र शेवटी शरद पवार यांनी पुढे येत स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा.

Advertisement

आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. ‘पूर्णपणे सूडबुद्धीनं माझ्या पतीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे’, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply