Take a fresh look at your lifestyle.

‘मीच देतो टाळी’ म्हणत मनसेची भाजपला साथ; बघा, कसा मेळ खातेय नवीन राजकीय समीकरण

पुणे :

Advertisement

राजकरणात व्यक्तींच्या आणि पक्षाच्या भूमिका बदलत असतात. जिथे संधी सापडेल तिथे राजकीय व्यक्ती किंवा पुढारी संधीचा फायदा घेत असतात. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेची भूमिका दिवसेंदिवस सेक्युलर होत चालली असल्याची ओरड हिंदुत्ववादी करत आहेत. आणि हिंदुत्ववादाची हीच पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसेने करण्याचे ठरविले आहे, असे दिसत आहे.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि भाजप नेत्याची भेट, हे सर्व राज ठाकरे यांची दिशा ठरवणारे आहे. एकूणच मनसेचा मूड बघता मनसे हिंदुत्वाच्या वाटेने जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अशातच भाजपच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Advertisement

मधल्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील मनसेसोबत युती करण्याची तयारी दाखवली होती. फक्त त्याला एक अटही घातली होती. आता शिवसेनेसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील, अशी अंदाज बांधला जात आहे.

Advertisement

 सध्या नाशिकमधील भाजप व मनसेच्या नेत्यांतील जवळीक अधिकच वाढली असून, शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. याआधीही मनपा निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होती. मात्र पुन्हा ते वेगवेगळे लढले. आता पुन्हा एकदा मनसेने ‘मीच देतो टाळी’ म्हणत भाजपला साथ देण्याचे ठरवले आहे, असे दिसते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply