Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणामुळे अंबानींच्या घरासमोर सापडली स्फोटके; ‘या’ माजी खासदाराने सांगितले ‘लॉजिकल’ उत्तर?

मुंबई :

Advertisement

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   

Advertisement

या घटनेचा तपास चालू असताना आता अजून एक लॉजिकल दिशा एका माजी खासदाराने सांगितली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणाचा एक वेगळाच दृष्टीकोन समोर आणला आहे.

Advertisement

‘अंबानींच्या घरासमोरच नेमकी स्फोटके कशी काय सापडतात? शेतकऱ्यांच्या रोषाला अंबानी पात्र ठरतात, त्यामुळे अंबानींबद्दल सहानुभूतीसाठी घडवलेले हे षडयंत्र आहे,’ असा आरोप शेट्टी यांनी शुक्रवारी केला.

Advertisement

इतकी स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, पोलीस, केंद्रीय पोलीस, ‘रॉ’ काय करत होते, असा प्रश्‍न उपस्थित करत आमची मुंबई सुरक्षित नाही का, याचे उत्तर राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रीय गुप्तचर खात्याने द्यावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. याशिवाय सीबीआयने आता जरा बाकीच्या राजकीय कामांपेक्षा स्फोटके नेमकी कोठून आली? याचा तपास करण्याकडेही लक्ष द्यावे, असा टोलाही शेट्टी यांनी हाणला.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply