Take a fresh look at your lifestyle.

अबबब.. असं कसं झालं, कांद्याच्या रोपात अफुच झाड आलं; नगरमध्ये तब्बल 2 लाखांची अफूची झाडे ‘अशाप्रकारे’ जप्त

मुंबई :

Advertisement

गरज ही शोधाची जननी असते, असे आपण म्हणतो मात्र हे सर्वार्थाने लागू होते. अगदी चोरी-चपाटी करण्यातही ही म्हण लागू होते. ‘अबबब.. असं कसं झालं, कांद्याच्या रोपात अफुच झाड आलं’ असंच म्हणावं लागेल, असा प्रकार नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडला आहे.

Advertisement

चक्क कांद्याच्या रोपात अफूची झाडे लावण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर वासुदेव महादेव काळे या शेतकर्‍याने आफूची झाडे लावण्यासाठी वेगळीच आयडिया शोधली. मात्र ‘आयडिया केली आणि खड्ड्यात गेली’, असे काहीसे त्याला अनुभवास आले आहे.

Advertisement

कांद्यात आफुची झाडे असल्याची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड त्यांनी पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकला. आणि  56 किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली.

Advertisement

आता सदर शेतकर्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व झाडे जप्त केली असून, आरोपीला अटक केली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply