Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील

गुजरात-अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे भारत-इंग्लंडमध्ये खेळलेला डे-नाईट कसोटी सामना अवघ्या 2 दिवसांत संपला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाला 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

Advertisement

फेब्रुवारी 1983  मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्ञानी झेल सिंह यांनी अहमदाबादच्या मोटेरा गावात ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’ ची पायाभरणी केली. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात नोव्हेंबर 1983 मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला. 38 वर्षांपूर्वी हे स्टेडियम केवळ 9 महिन्यांतच पूर्ण झाले होते.

Advertisement

हे मैदान नंतर ‘मोटेरा स्टेडियम’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 24 फेब्रुवारी 2021 रोजी त्याचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आले. तथापि, अद्याप संपूर्ण क्रीडा संकुल ‘सरदार वल्लभभाई पटेल’ च्या नावे आहे. केवळ ‘मोटेरा स्टेडियम’ चे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आले.

Advertisement

‘मोटेरा स्टेडियम’ पासून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ पर्यंत आतापर्यंत काय रेकॉर्ड बनले आहेत ते घ्या जाणून

Advertisement
  1. भारताचा महान फलंदाज सुनील गावस्करने 1987 मध्ये या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या.
  2. या मैदानावर सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी कारकीर्दीतील पहिले दुहेरी शतक (217) केले.
  3. 2009 मध्ये याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 177 धावांची खेळी करून राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या.
  4. हरभजन सिंगने या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक (115) केले.
  5. 1946 नंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळण्यात आलेल्या डे-नाईट कसोटी सामना 842 चेंडूचा होता. ही टेस्ट क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटी मॅच होती.
  6. रविचंद्रन अश्विन हा 25 फेब्रुवारी 2021 रोजी नव्याने निर्मित ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’मध्ये 400 विकेट्स पूर्ण करणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला.
  7. अक्षर पटेल हा या मैदानात डे-नाईट टेस्टमध्ये 10 बळी मिळविणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फिरकी गोलंदाज बनला.
  8. अक्षर पटेल कसोटी क्रिकेट इतिहासातील चौथा फिरकीपटू ठरला आहे. त्याने ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
  9. या घरच्या मैदानावर भारतीय कर्णधार विराट कोहली 22 कसोटी सामन्यांसह भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply