Take a fresh look at your lifestyle.

एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान

मुंबई :

Advertisement

26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. व्यापार दरम्यान सेन्सेक्स 1939 अंकाने तुटला. त्याचबरोबर निफ्टी जवळपास 587 अंकांनी घसरुन 14510 वर आला आहे. बाजारासाठी ग्लोबल सेंटीमेंट खूप वाईट आहेत. बँक आणि फाइनेंशियल शेअर्स मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहेत.

Advertisement

सेन्सेक्स सर्वच्या सर्व 30 ही शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ONGC आणि M&M मध्ये 6 % घसरण दिसून आली आहे. बैंक आणि फाइनेंशियल शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली आहे.  

Advertisement

जागतिक स्तराबद्दल बोलायचे झाल्यास, डाव जोन्स गुरुवारी 560 अंकांच्या घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर आज आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली.

Advertisement

बाजाराच्या या प्रचंड घसरणीत गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 6 लाख कोटी रुपये बुडाले. 25 फेब्रुवारी रोजी बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांची बाजारपेठ 2,06,18,471.67 कोटी रुपये होती. तर 26 फेब्रुवारी रोजी ती 2,00,64,472.99 कोटी रुपयांवर आली.

Advertisement

अमेरिकेने सीरियावर हल्ला केल्याने जगभरातील बाजारपेठेतील खळबळ माजली आहे. राजकीय ताणतणाव वाढला आहे. अमेरिकेने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या आदेशानुसार हा हल्ला झाला. इराण समर्थीत दहशतवादी संघटनांवर अमेरिकेने कारवाई केली आहे. हा हवाई हल्ला सीरिया आणि इराकच्या सीमेवर झाला आहे.

Advertisement

लॉर्जकैप शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. अ‍ॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, कोटक बँक आणि अजाज फिनसर्व्ह हे 6 टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचेही नुकसान झाले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply