Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक

दिल्ली :

Advertisement

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होतेय. निवडणूक आयोगाकडून एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.

Advertisement

या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही या पाच राज्यात निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी उपाययोजनांचीही माहिती दिली.

Advertisement

आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. 

Advertisement

आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार. निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना करोना नियमांचं पालन गरजेचं राहील. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल.

Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांतील उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख रुपयांचा खर्च करता येईल तर पुदुच्चेरीच्या उमेदवारींना जास्तीत जास्त २२ लाखांचा खर्च करण्याची परवानगी असेल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply