Take a fresh look at your lifestyle.

‘या’ 4 कारणांमुळे झाले साडेचार लाख कोटींचे नुकसान; वाचा, शेअर बाजारातील घसरणीमागची महत्वाची माहिती

मुंबई :

Advertisement

26 फेब्रुवारी, शुक्रवार रोजी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. व्यापार दरम्यान सेन्सेक्स 1800 अंकाने तुटला. त्याचबरोबर निफ्टी जवळपास 450 अंकांनी घसरुन 14600 वर आला आहे. बाजारासाठी ग्लोबल सेंटीमेंट खूप वाईट आहेत. बँक आणि फाइनेंशियल शेअर्स मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहेत.

Advertisement

बाजाराच्या या घसरणीमागे 2 मोठी कारणे आहेत. अमेरिकेत 10 वर्षाच्या बॉन्ड यील्डमध्ये तेजी आलेली आहे. त्याचवेळी अमेरिकेने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे निवेयकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डिसेंबरच्या तिमाहीत भारताच्या जीडीपीची आकडेवारी आज येईल, त्यापूर्वी निवेशक सावध दिसत आहेत. याक्षणी, बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे काही तासांत गुंतवणूकदारांचे सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Advertisement

जाणून घ्या ही महत्वाची कारणे :-

Advertisement
  1. सीरियावर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जगातील बाजारपेठेतील सेंटीमेंट खराब झालेल्या आहेत. राजकीय ताणतणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या आदेशानुसार हा हल्ला झाला. इराण समर्थीत दहशतवादी संघटनांवर अमेरिकेने कारवाई केली आहे. हा हवाई हल्ला सीरिया आणि इराकच्या सीमेवर झाला आहे. यानंतर निवेशक घाबरलेले आहेत.
  2. अमेरिकेत 10 वर्षांच्या बॉन्ड यील्डमध्ये तेजी आली आहे. बॉन्ड यील्ड वाढीमुळे गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केट सारख्या जोखमीच्या गुंतवणूकीच्या पर्यायांपासून दूर केले गेले आहे. बॉन्ड यील्डमध्ये केवळ यूएसच नव्हे तर जपान आणि भारतमध्येही वाढ झाली असून यामुळे इक्विटी बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.
  3. आज देशाची आर्थिक अवस्था कळेल. डिसेंबर तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर केले जातील. असा अंदाज आहे की, डिसेंबर तिमाहीत ग्रोथ बद्दल चांगली बातमी मिळू शकते. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेविषयी कोणतीही नकारात्मक भावना बाजार कमकुवत होण्याचे कारण बनू शकते.
  4. बाजारासाठी जागतिक भावना कमकुवत आहेत. गुरुवारी अमेरिकेच्या प्रमुख बाजारामध्ये जोरदार विक्री झाली. डाव जोन्समध्ये 560 अंकांची घसरण झाली आणि बाजार 31,402 च्या पातळीवर बंद झाला. नॅस्डॅक आणि S&P 500 इंडेक्स ही कमजोर झाले.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply