Take a fresh look at your lifestyle.

दोनच तासात 4.32 लाख कोटींचा फटका; ‘त्या’ घटनेने बाजाराला बसला मोठा झटका..!

मुंबई :

Advertisement

अमेरिकेने सिरीया देशावर केलेल्या आक्रमणाचा परिणाम अवघ्या जगभरातील मार्केटवर दिसत आहे. भारतीय बाजारातही यामुळे इन्व्हेस्टर्स मंडळींना अवघ्या दोन तासात 4.32 लाख कोटी रुपयांचा फटका झाहन करावा लागला आहे.

Advertisement

अध्यक्ष जो बिडेन यांच्या आदेशानुसार हे हवाई हल्ले झाले आहेत. इराण समर्थीत दहशतवादी संघटनांवर अमेरिकेने कारवाई केली आहे. हा हवाई हल्ला सीरिया आणि इराकच्या सीमेवर झाला आहे. परिणामी जगभरात तणाव आहे.

Advertisement

सीरियावर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामुळे आज जगभरातील बाजारपेठेवर परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या बाजारपेठा मोठ्या घसरणीने बंद झाल्यावर आशियाई बाजारातही तोच ट्रेंड दिसत आहे.

Advertisement

बँक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. वाहन निर्देशांक 2 टक्क्यांनी, तर धातू आणि मालमत्ता निर्देशांक 3 टक्क्यांनी खाली आलेला आहे. आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी आणि एफएमसीजी निर्देशांकातही 1 टक्क्यांनी घट झाली आहे.

Advertisement

सध्या सेन्सेक्स सुमारे 1500 अंकांनी खाली येऊन तो आज 49526 च्या पातळीवर घसरला आहे. त्याचबरोबर निफ्टी 435 अंकांनी खाली आला असून तो 14660 च्या पातळीवर आला आहे. बाजारात विक्रीचा जोर आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply