Take a fresh look at your lifestyle.

मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय

मुंबई :

Advertisement

देशातील सरावात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Advertisement

या अनोळखी स्कार्पिओ गाडीत एक धमकीचे पत्र असल्याचेही उघड झाले आहे. आणि या पत्रात थेट अंबानी कुटुंबाला सांभाळून राहण्यास सांगितले आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने..संभल जाना.’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

Advertisement

याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. ती कार काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी करण्यात आली होती. कारचे चेसीस नंबर पुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलीस कारच्या मालकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत.

Advertisement

मुंबईत ज्या-ज्या ठिकाणांहून कार गेली आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. बर्‍यापैकी पुरावे हाती आल्याने आता आता सदर कृत्य करणारी व्यक्ती सापडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

कारमध्ये मिळालेल्या स्फोटकांच्या बाबत पोलिसांनी सांगितले की, या मिलिट्री ग्रेड जिलेटिन नाहीत. सापडलेल्या जिलेटिन या सर्वसाधारणपणे बांधकाम साइटवर खोदकामासाठी वापरल्या जातात.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply