Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदी सरकार कृषी विधेयकावर आहे ठाम; पहा नेमके काय म्हटलेय मंत्र्यांनी

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकामुळे नेमके काय होणार, हेच सामान्य शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे. कारण, आंदोलक याच्या त्रुटी सांगत आहेत, तर सरकार स्वतःचेच कोडकौतुक करीत आहे. आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही त्याचाच पुनरुच्चार केला आहे.

Advertisement

ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी शेती ही देशाच्या जीडीपीच्या जवळपास निम्म्या होती. ज्याचा टक्का आता खूपच कमी झाला आहे. इतर क्षेत्र शेतीपेक्षा खूप पुढे आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे इतर ठिकाणी वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यांच्यासाठी नवे कायदे बनविण्यात आले आणि त्यांच्यासाठी खासगी भांडवल मंजूर झाले.

Advertisement

परंतु, शेतीच्या कायद्यात कोणताही बदल झाला नाही. ज्यामुळे ते इतर क्षेत्रांपेक्षा मागे राहिले. उलट नवीन कायदे हे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. असेल तर अशा परिस्थितीत अशा शेतकरी आंदोलने व्हायला हव्यात का, असाही प्रश्न तोमर यांनी केला आहे.

Advertisement

पुसा किसान प्रदर्शनात तोमर म्हणाले की, आज देशातील 86  टक्के शेतक्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांच्यात कोणतीही मोठी गुंतवणूक नाही. परिणामी या शेतकर्‍यांना फायदा होत नाहीशेतकरी कर्जात बुडण्याचे हे महत्वाचे कारण आहे. या परिस्थितीमुळे निराश झालेले शेतकरी पुत्र शेती सोडून शहरांत जाऊन नोकर्‍या शोधत आहेत. परंतु जर त्यांची शेती फायद्याची केली गेली तर हे स्थलांतर थांबेल. सरकार नवीन कृषी कायद्यांच्या मदतीने हे करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Advertisement

कृषिमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारला असे मॉडेल तयार करायचे आहे की जेथे शेतकरी आपली पिके पाहिजे तेथे विक्री करु शकतील. त्यामध्ये कुठेही जमिनीशी तडजोड केली जाऊ शकत नाही. परंतु यानंतरही देशातील शेतकऱ्यांना चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply