Take a fresh look at your lifestyle.

आता सोनिया गांधींचे जावईही येणार राजकारणात; म्हणाले, ‘त्यांना’ राजकारणापासून दूर ठेवलं असतं

दिल्ली :

Advertisement

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे भाऊजी आणि प्रियांका गांधी यांचे पती प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रादेखील आता राजकरणात येणार असल्याची घोषणा स्वत: वाड्रा यांनी केली आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधीचे जावई असणारे रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात येणार, अशा चर्चा होत असायच्या. मात्र आता जयपूरमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांना ‘तुम्ही राजकारणात येणार का’? असा प्रश्न विचारला गेला.

Advertisement

यावेळी वाड्रा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती असलेले वाद्रा हे निवडणूक लढवणार की संघटनावर काम करणार, याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही.

Advertisement

वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. . गेल्या 25 वर्षात आपण राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही विचार केला नव्हता. मात्र मी आता राजकारणात येणार आहे.’ असे वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

मध्य प्रदेशमधील हिंदू महासभेचे माजी नेते आणि नथुराम गोडसे यांचा पुतळा बसवण्यात सक्रीय असलेल्या बाबूलाल चौरासिया यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर, ‘मला या विषयाची माहिती नाही, पण मी असतो तर गोडसेची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मी राजकारणापासून दूर ठेवलं असतं,’असे वाड्रा यांनी स्पष्ट केले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply