Take a fresh look at your lifestyle.

‘तिथे’ पेट्रोल मिळते कवडीमोल भावात; पहा सर्वाधिक स्वस्ताईवाली ठिकाणे

पेट्रोल व डीझेल यांच्या दरवाढीने अवघ्या देशाचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक खर्च आणि प्रवास खर्च वाढल्याने या इंधन दरवाढीने इतर सेक्टरलाही भाववाढीची संधी दिली आहे. भारतात काही ठिकाणी 100 रुपये लिटरने पेट्रोल मिळत असतानाच काही देशात मात्र त्याचे भाव कवडीमोल आहेत.

Advertisement

आज आपण असेच देश आणि त्यांची माहिती पाहणार आहोत, जिथे पेट्रोल हे स्वस्त म्हणजे अगदी 5 ते 30 रुपये लिटरच्या आताच मिळते.

Advertisement

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तान देशामध्येही पेट्रोलचे भाव मापात आहेत. त्या देशात सध्या पेट्रोल भाव 51.13 रुपये इतकाच आहे. तर, भारताचा दुसरा शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या पेट्रोल 76.40 रुपये लीटर आहे.

Advertisement

व्हेनेझुएला देशात सर्वात कमी किमतीला पेट्रोल मिळते. तिथे भारतीय चलनामध्ये विचार केल्यास सध्या पेट्रोल फ़क़्त 1.45 रुपये लीटर इतक्या भावाने मिळते.

Advertisement

तर, इराण देशात सध्या पेट्रोलचे भाव 4.49 रुपये इतकेच आहेत. अंगोला देशात 17.82 रुपये, अल्जेरियात 25.15 रुपये, तर कुवेतमध्ये 25.25 रुपये रेटने पेट्रोल ग्राहकांना मिळत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply