Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांना’ १ रुपये किलोने मिळणार ज्वारी व मका; पहा कसा होणार लाभ ते

नागपूर / यवतमाळ :

Advertisement

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कुटुंबांना तांदूळ व गहू सोबत मका किंवा ज्वारी हे भरडधान्य फ़क़्त १ रुपये किलोने देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यवतमाळ येथील  जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

मागील दोन वर्षात सरकारने मका आणि ज्वारी यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. शासकीय गोदामांमध्ये पडून असलेला हा शेतमाल आता रेशनवर देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार अत्याेदय आणि प्राधान्य गटातील ग्राहकांना एक रुपया किलो दराने ज्वारी व मका दिला जाणार आहे.

Advertisement

ज्वारी व मका किंवा यामधील एक अन्नधान्य देतानाच तितकाच गहु मात्र त्यांच्या कार्डवरून वजा करण्यात येणार आहे. बाजारात सध्या भरड धान्याचे भाव यापेक्षा पाच ते सहा पटीने अधिक आहेत. यामुळे शिधापत्रिका धारकांना दिलासा मिळेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Advertisement

बीपीएल, अत्याेदय, प्राधान्य गट, केशरी कार्डधारक, शेतकरी गट, अन्नपुर्णा कार्डधारकांना धान्य वितरित करण्यात येते.  मार्च महिन्यापासून अंत्याेदय कार्डधारकाला प्रति कार्ड ५ किलो गहू, १० किलो भरड धान्य आणि २० किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती २ किलो गहू, २ किलो भरड धान्य, २ किलो प्रति व्यक्ती तांदूळ मिळणार आहे. भरड धान्यासाठी रेशन दुकानात प्रत्येक किलोवर एक रुपया दर लागणार आहे. हे धान्य मिळताच गव्हाचा तितकाच कोटा कमी होणार आहे. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply