Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. शिक्षण विभागात ‘बोगसां’चा बाजार; विभागीय चौकशी झाली सुरू..!

जळगाव :

Advertisement

धुळे जिल्ह्यातील बोगस मान्यता प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच जळगाव येथेही आता असेच प्रकार झाल्याच्या शक्यतेने उचल खाल्ली आहे. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून याची चाैकशी सुरू झाली अाहे.

Advertisement

जळगावातील माध्यमिक शिक्षण विभागातून बाेगस मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. कारण, मान्यता प्रस्तावांचे काेठेही रेकाॅर्ड नसलेली प्रकरणे सापडत आहेत. शिक्षण विभागातील बहुतांश रेकाॅर्ड त्यांनी जप्त केले अाहे. जप्त केलेल्या रेकाॅर्डची संपूर्ण माहिती त्यांनी १० मार्चपर्यंत सादर करण्याची मुदत शिक्षण विभागाला दिली अाहे.

Advertisement

मान्यता प्रस्तावांचे काेठेही रेकाॅर्ड नसणे, अावक-जावक नाेंदी नसणे, केवळ एकाच स्वाक्षरीवर मान्यता देणे, महत्वाचे शैक्षणिक रेकाॅर्ड न ठेवणे यासह विविध तक्रारी असल्याची गंभीर बाब शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी केलेल्या तपासणीमध्ये समोर आलेली आहे.

Advertisement

माेठ्या प्रमाणावर बाेगस मान्यतांचा विषय पुढे अालेला अाहे. शिक्षण उपसंचालकांनी तडकाफडकी समिती नेमून येथे चाैकशी सुरू केली अाहे. धुळ्यातील चाैकशी पूर्ण झाल्यानंतर हिच समिती जळगावात देखील चाैकशी करणार आहे.

Advertisement

दरम्यान, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी १५ फेब्रुवारी राेजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बैठक घेतली हाेती. या बैठकीत शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील हे अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली अाहे. या चौकशीने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply