Take a fresh look at your lifestyle.

मुकेश अंबानी आणि कुटुंबाला धमकीचे पत्र; वाचा, काय होता ‘त्या’ पत्रातील मजकूर

मुंबई :

Advertisement

भारताचे दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काल स्फोटकांनी भरलेली एक कार असल्याचे आढळून आले होते. ही कार कोणी लावली होती, हे अद्याप समजले नसले तरी यामुळे अंबानी कुटुंबाला धोका होण्याची शक्यता होती.

Advertisement

अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अनोळखी स्कार्पिओ गाडीत एक धमकीचे पत्र असल्याचेही उघड झाले आहे. आणि या पत्रात थेट अंबानी कुटुंबाला सांभाळून राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने..संभल जाना.’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आलेल्या आहेत. 

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीतून एक व्यक्ती उतरला आणि मागून अजून एक गाडी आली त्यात तो बसून गेला. गाडीचा लाईट मोठा असल्याने नंबर प्लेट मात्र दिसू शकली नाही.

Advertisement

याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply