Take a fresh look at your lifestyle.

म्हणून डी-मार्टला झाला दंड; पहा नेमके काय कारण घडले त्यासाठी

जळगाव :

Advertisement

देशभरात पुन्हा एकदा कोविड 19 आजाराची लाट आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ग्राहकांची गर्दी नियंत्रणात न ठेवल्याच्या कारणाने डी-मार्ट या मॉलवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे.

Advertisement

काेराेनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे अावाहन केले जात असताना डी-मार्ट या माॅलमध्ये प्रचंड गर्दी अाढळून आल्याने महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठाेकले हाेते. याप्रकरणी डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठाेठावला अाहे. 

Advertisement

उपायुक्त संताेष वाहुळे यांनी सांगितले की, दंड न भरल्यास शुक्रवारी बाेर्ड अाॅफ डायरेक्टरविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार आहे. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाने कारवाईची धडाका लावला आहे.

Advertisement

कोविड 19 आजारावर लस येत असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान केंद्र आणि राज्य सरकारपुढे आहे. अशावेळी आता स्थानिक प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनीही मग कारवाईची धडाका लावला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply