मुंबई :
इंधन दरवाढ, जीएसटी, ई-वे बिल या मुद्द्यांवर व्यापाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातील जवळपास 8 कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 40 हजार व्यापारी संघटनांनी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे.
मात्र हे सगळे घडत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सने (FAIM) यामध्ये सामील होण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सच्या या ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे ‘भारत बंद’ आंदोलनात फुट पडली असल्याचे पहायला मिळत आहे. आजच्या दिवशी 8 कोटीहून अधिक व्यापारी संपावर असतील, असा दावा सीएआयटीने केला आहे.
दरम्यान फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सच्या ऐणवेळीच्या भूमिकेमुळे गडबड झाल्याचे समजत आहे. ‘दुकान बंद करणे किंवा भारत बंद यासारख्या विचारसरणीपासून FAIM दूर आहे. मात्र जीएसटी सुधारण्याची गरज असून त्यासाठी वाटाघाटीचा मार्ग अवलंबला पाहिजे’, अशी आपली भूमिका असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सने स्पष्ट केले.
पुढे या संघटनेने सांगितले की, कोरोना साथीच्या काळात अर्थव्यवस्था गंभीर टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत जबाबदार नागरिक म्हणून व्यापा्यांनी आंदोलनांपासून दूर राहिले पाहिजे. FAIM कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 22 फेब्रुवारी 2021 रोजी 200 जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीएसटी सुधारण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- करोना झाल्यावर ‘अशी’ लक्षणे असल्यास तत्काळ कार्डियाेलाॅजीस्टचा सल्ला घ्याच..
- संकटात भर : ‘त्यामुळे’ पाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी नसणार कामावर..!
- करोना कवच : फ़क़्त 157 रुपयात घ्या ‘ही’ पॉलिसी; SBI ने आणली आहे खास स्कीम
- बाब्बो.. तर असा होता वाझेचा गेम प्लॅन; पहा ‘त्या’ अँगलचाही तपास सुरू केलाय एनआयएने
- पानंद व शेत रस्त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी