Take a fresh look at your lifestyle.

महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद

मुंबई :

Advertisement

आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणाकरिता ३ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी याबाबत आग्रह धरला होता.

Advertisement

महिला व बाल कल्याणाकरिता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिला व बाल कल्याणाकरिता चिन्हांकित निधीबाबतही (इव्हॅल्युएटेड फन्ड्स फॉर वुमन ॲण्ड चाईल्ड वेल्फेअर) सुचनांचा समावेश आहे.

Advertisement

महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ पासून महिला व बाल कल्याणाकरिता काही अतिरिक्त जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ मध्ये महिला व बाल कल्याणाकरिता ३ टक्के निधी राखीव म्हणून उपलब्ध करावयाचा आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply