Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी राहिले योजनेपासून वंचित..!

सोलापूर / उस्मानाबाद :

Advertisement

बँक अधिकारी हे फ़क़्त पगारासाठीच पाट्या टाकण्याचे काम करतात की काय अशीच देशभरात परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात त्याचाच प्रत्यय हजारो शेतकऱ्यांना आलेला आहे. बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर प्रकाशझोत टाकणारी एक महत्वाची बातमी दिव्य मराठी दैनिकात प्रसिद्ध झालेली आहे.

Advertisement

शेती कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत व्याजाची रक्कम परत देण्याची महत्वाची योजना राबवली जाते. मात्र, त्यासाठी मुदतीत शेतीकर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावे लागतात. त्यातच बँकांनी हलगर्जीपणा केल्याची माहिती पुढे आली आहे.

Advertisement

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११८ पैकी तब्बल ७० बँकांनी यासदंर्भात माहितीच सादर न केल्याने हजारो शेतकरी कोट्यवधी रुपयांच्या व्याजाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे व्याज पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून परत केले जाते. यामध्ये संबधित शेतकऱ्याने शेतीकर्जाची ३० जून या तारखेपूर्वी व्याजासह परतफेड करणे आवश्यक आहे.

Advertisement

स योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतीत कर्जाची परतफेड केलेल्या आपल्या शाखेतील शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्यांच्या कर्जावरील व्याजाच्या रक्कमेसह जिल्हा उपनिबधंक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करणे आवश्यक असते. जिल्ह्यातील ७० शाखांकडून ही माहितीच उपलब्ध होत नसल्यामुळे हजारो शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने पुढे आलेली आहे.

Advertisement

दतीत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले हाेते. त्यानुसार या कार्यालयाने सदरील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तब्बल ७ कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे. त्यानुसार संबधित बँकांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांमध्ये एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, आयसीआयसीआय, कॅनरा बँक अशा दिग्गज बँकांचा समावेश आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement
1 Comment
  1. Gaurav patil says

Leave a Reply