Take a fresh look at your lifestyle.

शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित

नागपूर :

Advertisement

वनमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. पोलिसांचा तपास चालू असतानाच अशा पद्धतीने राजकीयदृष्ट्या कार्यक्रम घेऊन त्यांनी आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे, अशीच चर्चा आहे. दरम्यान, पोहरादेवी येथील वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर महंतांसह आठजण करोनाबाधित झाल्याची बातमी आलेली आहे.

Advertisement

महंत कबीरदास यांच्यासह ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यामध्ये महाराजांच्या कुटुंबातील ४ जणांचा समावेश अाहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यात संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटिसा बजावल्या होत्या. दि. २२ रोजी गावातील ३० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या केल्यानंतर महंत कबीरदास महाराज आणि त्यांच्या कुटुंबातील ४ जणांसह ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Advertisement

दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संशयाच्या फेऱ्यात अडकलेल्या वनमंत्री राठोड यांनी मंगळवार, दि.२३ रोजी पोहरादेवी गडावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. या वेळी सुमारे ८ ते १० हजारांचा जमाव होता. म्हणजेच तिथे करोना विषाणूचा कहर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

वनमंत्री राठोड यांनी महंत कबीरदास यांचे दर्शन घेतले होते. या वेळी प्रचंड गर्दी होती. महंतांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आता वनमंत्र्यांनाही चाचणी करावी लागण्याची शक्यता आहे. शिवाय त्यानंतर बुधवारी राठोड हे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही सहभागी झाले होते. त्यामुळे किती आणि कोणते मंत्री व अधिकारी यामुळे करोनाबाधित झालेले आहेत हे कळण्यासाठी सर्वांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत.

Advertisement

भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी नराधम संजय राठाेड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारही अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाहीत अशीच अपेक्षा आहे.

Advertisement

र्दीप्रकरणी ८ ते १० हजार जणांच्या जमावाविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही त्यात मुख्य असलेल्या वनमंत्री राठोड यांचे नाव नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे.

Advertisement

पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी याबाबत म्हटले आहे की, जा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत असून, तो योग्य दिशेने सुरू आहे.  ‘जर-तर’ वर नव्हे तर पोलिसांचा तपास तथ्यावर चालतो. पुणे पोलिस तपास करत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply