मोदी तर ‘त्यांच्यापेक्षा’ महान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ‘तेव्हा’ झालाच होता; शिवसेनेने भाजपला करून दिली आठवण
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमला दिल्याने परवापासून देशभरात हा टीकेचा विषय झाला आहे. सरदार पटेल यांचे नाव खोडून मोदींचे नाव देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनातून निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे अग्रलेखात :-
जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल!
अशा मोठय़ा कामांची जंत्री मोठी आहे म्हणून वाजंत्री लावून सांगण्याची गरज नाही. आज हा विषय वाजंत्री लावून चर्चेला आला आहे तो जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला नरेंद्रभाई मोदी यांचे नाव दिल्यामुळे. गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते. आता मोदी यांचे नाव दिलेले मोटेरा स्टेडियम जगात सगळय़ात मोठे असेल. मोदी यांचे नाव या मोठय़ा स्टेडियमला दिले हा टीकेचा विषय कसा काय होऊ शकतो?
मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या?
सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाटय़ाचा भाग आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून ‘त्या’ गावात झाला करोना स्फोट; एकाचवेळी तब्बल 93 लॉक झाले पॉझिटिव्ह..!
- म्हणून परराज्यातील नागरिक व गाववाल्यांनी सोडलेय शहर; पहा नेमकी काय आहे महाराष्ट्रात परिस्थिती
- पुणे पोलिसांनी दिला महत्वाचा संदेश; पहा ‘बाहुबली’चा तो सीन दाखवून काय म्हटलेय त्यांनी
- धक्कादायक : म्हणून फेसबुकने घेतला ‘तो’ निर्णय; पहा कोणत्या देशांना बसलाय राजकीयदृष्ट्या फटका..!
- ठाकरेंच्या लॉकडाऊनवर सुप्रिया सुळे यांनी घेतली ‘ही’ भूमिका; पहा काय म्हणणे आहे त्यांचे