Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : अंबानींच्या घराजवळ जिलेटिनवाली कार; पोलिसांचा तपास सुरू

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील एक प्रमुख श्रीमंत व्यक्ती बनलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या भव्य निवासस्थानाजवळ गुरुवारी संध्याकाळी जिलेटिन या स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे.

Advertisement

स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीआहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. रिलायंस कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या अंबानी यांच्यावर विविध क्षेत्रातून आरोप होत असतात. त्याचवेळी त्यांचा व्यवसाय अभूतपूर्व तेजीत आहे.

Advertisement

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे की, ती गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर काढलेला आहे. ही स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply