मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमला दिल्याने परवापासून देशभरात हा टीकेचा विषय झाला आहे. सरदार पटेल यांचे नाव खोडून मोदींचे नाव देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनातून निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे अग्रलेखात :-
सरदार पटेल, पंडित नेहरू यांच्याकडे बहुमत होते ते देश घडविण्यासाठी. नेहरू यांनी आयआयटीपासून भाभा अणुशक्ती केंद्र, भाक्रा-नांगल योजना राष्ट्राला समर्पित केल्या.
मोदी यांच्या काळात काय झाले, तर जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला सरदार पटेलांचे नाव होते ते पुसून मोदींचे नाव दिले, असे त्यांच्या भक्तांना इतिहासात नोंद करून हवे आहे काय?
सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल. उद्या प. बंगालात सत्तांतर झाले तर (शक्यता अजिबात नाही) नेताजी बोस यांच्या नावे असलेल्या संस्थांची नावेही बदलली जातील अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.
सरदार पटेल हे काही फक्त गुजरातचे पुढारी नव्हते. गांधी-नेहरूंप्रमाणे ते देशाचे आदर्श होते व आहेत, पण सरदार पटेलांचे कोणते आदर्श या सरकारने पाळले? स्वातंत्र्याच्या महाभारतातील ‘बारडोलीचा लढा’ हे अत्यंत तेजस्वी पर्व म्हणून समजले जाते.
हा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचा लढा होता व त्याचे नेतृत्व सरदार पटेलांनी केले. त्यानंतर दोनच वर्षांनी कराची येथे भरलेल्या शेहेचाळिसाव्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेलांची निवड झाली.
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ”मी शेतकरी आहे!” (”हूं खेडूत छू!”) अशी गर्जना करणारे सरदार पटेल हे पहिलेच अध्यक्ष होते, पण आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? चार महिने झाले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे.
आंदोलनातला शेतकरी सरदार पटेलांचा जयजयकार करीत आहे म्हणून सरदार पटेल यांच्या नावाची स्टेडियमवरील पाटी पुसण्यात आली काय? मोदी यांच्या सरकारला भव्यदिव्य, उत्कट असे काही करायचे असेल तर त्याचे स्वागत आहे, पण आधीचेच प्रकल्प रंगरंगोटी करून बदलण्यात व नामांतरे घडविण्यात काय हशील! अर्थात, जे घडले त्यात मोदींचा काही दोष नसावा.
मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. त्यांचे भक्तच त्यांच्या नावाने हे भलतेसलते उद्योग करीत आहेत. मोदी हे एकदम योग्यासारखे तटस्थ व नम्र असल्याने ते या उद्योगांकडे थंडपणे पाहतात इतकेच.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला