Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बँक निवडणूक : एकच वस्ताद ‘असा’ पडला महाविकास आघाडीला भारी; 109 पैकी 94 मते मिळवत मंत्री, आमदारांना दिला झटका

अहमदनगर :

Advertisement

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले. मात्र तरीही राजकरणात वस्ताद समजल्या जाणार्‍या एका पठ्ठ्याने महाविकास आघाडीला तोंडावर पाडले.  

Advertisement

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. एका बाजूला महाविकास आघाडीने बँकेवर वर्चस्व मिळवले असले तरीही एका जागेवर मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अवघे पंधरा मते मिळाली आहेत.

Advertisement

109 पैकी 94 मते मिळवत भाजप नेते व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विजय मिळवला. कर्डिले यांना विखे आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या डावाचा अंदाज न आल्याने अखेरीस कर्डिलेच एकाकी झाले. मात्र तरीही चितपाठ होईपर्यंत कुस्ती संपलेली नसते,  हे लक्षात घेऊन कर्डिलेंनी कडवी झुंज दिली. आणि भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का दिला.

Advertisement

या भागात महाविकास आघाडीची दिग्गज मंडळी असतानाही महाविकास आघाडी पाठीमागे राहिली आहे. सर्व जागांवर बिनविरोधसाठी अखंड प्रयत्न करूनही कर्डिले यांना स्वत:ला निवडणुकीला सामोरे जावे लागले. असे असले तरीही सोसायटयांवर त्याच्यामध्ये त्याठिकाणी वर्चस्व असल्याने कर्डिले मोठ्या फरकाने निवडून आले.

Advertisement

यावेळी कर्डिले एकटे पडले असले तरीही त्यांनी आपली राजकीय पकड अजून ‘ढील्ली’ झाले नसल्याचे दाखवून दिले. ही निवडणूक कर्डिले यांनी एकतर्फी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हे अपयश कुणाचे? अशी चर्चा होऊ लागली आहे.

Advertisement

कर्डिले यांच्या विजयाने नगर तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. मंत्री प्राजक्त तणपुरे, आमदार नीलेश लंके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गाडे, जी.प. सदस्य संदेश कारले, जी.प उपाध्यक्ष प्रताप शेळके आणि इतर तगड्या नेत्यांची चलती असतानाही कर्डिले यांचे मोठ्या फरकाने निवडुन येणे, हा महाविकास आघाडीला धक्काच आहे.        

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply