Take a fresh look at your lifestyle.

PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ

मुंबई :

Advertisement

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या चर्चा सत्रामध्ये पंतप्रधान मोदींनी सरकारी उपक्रमांमधील सरकारी भागीदारी काढून घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केले.

Advertisement

यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 100 कंपन्या विकून अडीच लाख कोटी रुपये उभे करण्याचे निश्चित केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकार या कंपन्यांमधील निर्गुंतवणूकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपये उभारणार असल्याचे म्हटले होते.

Advertisement

त्यामुळे आता नेमकं चुकलं कोण? हा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहे. एकतर मोदीजींनी आकडा चुकीचा सांगितला आहे किंवा निर्मला सीतारामन यांनी तरी.. नेमकं चुकलं कोण हे अजून तरी कळले नाही.

Advertisement

नेहमीप्रमाणे केंद्र सरकारने याही आकडेवारीत घोळ घातल्याचे समोर आले आहे. या प्रश्नाकडे विरोधी पक्षनेत्याने अजूनही लक्ष दिलेले नाही. एवढी मोठी तफावत एवढ्या बड्या पदावर असणार्‍या नेत्यांकडून होण्याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

सध्या मोदी सरकारने देशातील बड्या बड्या देशातील कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. केंद्र सरकारच्या कंपन्या विक्रीच्या निर्णयावर टीकाही होत आहे. मात्र कुणालाही न जुमानता आपल्या हेकेखोर स्वभावाप्रमाणे केंद्र सरकारने अजून तब्बल 100 कंपन्या विकण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply