Take a fresh look at your lifestyle.

अमरावती, वर्ध्यानंतर या 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट; ‘तिथे’ लॉकडाउनची शक्यता

अहमदनगर :

Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेननं शिरकाव केला आहे. हा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेकही वाढला आहे.  आज राज्यात आठ हजार 807 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1167 तर पुणे शहरात 743 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisement

गेल्या आठवडय़ात नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये रुग्ण वाढले होते. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नगर, जळगाव, नागपूर, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत अडीच हजारांनी वाढ झाली आहे.

Advertisement

त्यामुळे आता यापैकी काही शहरात रुग्णसख्या वाढल्यास लॉकडाउन होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या आणखी दोन-तीन दिवस अशीच वाढल्यास राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करण्यासाठी पावले उचलावी लागू शकतात.

Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीतही वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याचे निर्देश देतानाच पालकमंत्र्यांनाही आपापल्या विभागात लक्ष देण्यास सांगितले. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply