Take a fresh look at your lifestyle.

‘कॅट’च्या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र चेंबरही सहभागी; 7 कोटी व्यापाऱ्यांचा एल्गार

पुणे :

Advertisement

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या संस्थेने जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी, फूड सेफ्टी ऍक्टमधील चुकीच्या तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Advertisement

टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (दि. 26 फेब्रुवारी) एक दिवसीय ‘राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद’ घोषित केला आहे. या बंदमध्ये ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज’ सहभागी होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्सचे राष्ट्रीय संघटन मंत्री  ललित गांधी यांनी दिली.

जीएसटी कायद्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे एक हजार इतक्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. जीएसटीचे सॉफ्टवेअरसुद्धा कार्यक्षम पद्धतीने काम करत नाही. तसेच या दुरुस्त्यामध्ये नोंदणी रद्द करण्यापर्यंतची अमर्याद अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासह इतर अनेक विसंगती जीएसटी कायद्यामध्ये सातत्याने निर्माण होत आहेत. या जाचक तरतुदी रद्द करून, जीएसटी अधिक सोपा व सुटसुटीत करावा या प्रमुख मागणीसाठी व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे.

Advertisement

फूड सेफ्टी ऍक्टमधील असलेल्या जाचक तरतुदी रद्द कराव्यात, टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये या मागण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया  ट्रेडर्स तर्फे 26 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय व्यापार व वाहतूक बंद घोषित केला आहे. या बंदला देशभरातील विविध व्यापारी संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असून हा बंद यशस्वी करण्यासाठी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिय व राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पदाधिकारी कार्य करीत आहेत.

Advertisement

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वाहतूकदारांनी या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष व  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स चे राष्ट्रिय संघटन मंत्री ललित गांधी व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

एक दिवसीय बंद मध्ये दोन तासांचे धरणे आंदोलन, जीएसटी आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रात सर्वत्र करण्यात आले असल्याची माहितीही ललित गांधी यांनी दिली आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply