Take a fresh look at your lifestyle.

पुजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेणार्‍या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकीर्द

आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिस दबावाखाली असल्याचे आरोप करत थेट पुजा चव्हाणने जिथे आत्महत्या केली होती, त्या स्पॉटला भेट दिली. तसेच पोलिस स्टेशनला जाऊन तिथेही प्रश्न केले.   

Advertisement

वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तसेच महाविकास आघाडीविरुद्ध सातत्याने आक्रमक भूमिका घेणार्‍या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण? हे जाणून घेऊयात.

Advertisement

राज्याच्या राजकरणात सुरुवातीला चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या ‘महिला प्रदेशाध्यक्ष’ पदावर असताना प्रसिद्ध झाल्या. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतलेल्या आक्रमक भूमिकामुळे त्या लोकांना माहिती होऊ लागल्या. अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या चित्रा वाघ यांनी ऐनवेळी भाजपची वाट धरली.

Advertisement

भाजपवर सातत्याने टीका करणार्‍या चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा का दिला, याच्या चर्चा होऊ लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्यांनी पक्ष सोडल्याचे म्हटले जाऊ लागले मात्र शेवटी शरद पवार यांनी पुढे येत स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा.

Advertisement

काय होते हे ईडीचे प्रकरण :-

Advertisement

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जाते.        

Advertisement

आता चित्रा वाघ या भाजपच्या मोठ्या पदाधिकारी आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध त्या आक्रमक भूमिका घेत असतात.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply