Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; ‘त्या’ मुद्दयावरुन नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला इशारा

मुंबई :

Advertisement

आक्रमक आणि ओबीसी चेहरा म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस नेते नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता त्याची चुणूक पटोलेंनी दाखवून दिली आहे.

Advertisement

‘काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे’ असे म्हणत नाना पटोलेंनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. आता आक्रमक पटोलेंनी भाष्य केल्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुर वाढणार हे मात्र निश्चित आहे.

Advertisement

पटोले म्हणाले की, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात असू द्या, असे सांगतानाच एखादी गोष्ट कमी दिली जात असेल तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे.

Advertisement

काँग्रेस आमदारांना सातत्याने निधी कमी दिला जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. याआधी यावरून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र आता पटोलेंनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे हा प्रकार बोलून दाखवला आहे.

Advertisement

एवढेच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ‘काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात असू द्या’, असा इशाराही दिला आहे. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.

Advertisement

हे पद काँग्रेसकडेच राहणार की महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांकडून या पदावर दावा सांगितला जाणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. काँग्रेसने मात्र हे पद आपल्याकडेच राहणार असल्याचे वारंवार सांगितले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply