Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ५ मिनिटांच्या चार्जमध्ये १०० किलोमीटर जाणार ‘ही’ कार..!

पेट्रोल आणि डीझेल यांचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींना प्रोत्साहन दिलेले आहे. अशावेळी नवनवीन कार, दुचाकी आणि बस बाजारात दाखल होत आहेत किंवा येण्याच्या तयारीत आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीने फ़क़्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तब्बल १०० किलोमीटरवर जाणारी कार बनवली आहे.

Advertisement

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने मध्यम आकारची इलेक्ट्रिक क्रॉसओवर कार इओनीक ५ बाजारात आणली आहे. पाच वर्षानी ही कर जागतिक इलेक्ट्रिक वाहने उत्पादकांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर येईल असा कंपनीचा विश्वास आहे.

Advertisement

इयोनीक फाइव ही कार लाँच करण्याचे ह्युंदाईचे दीर्घकालीन उद्दीष्ट आहे.  जागतिक इलेक्ट्रिक वाहन विक्रीत किमान १० टक्के वाटा मिळवणे, हे सध्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. इओनीक ५ ही कार एका चार्जिंगमध्ये ४८० किलोमीटर जाऊ शकेल. तसेच चालकाला ही कार १८५ किलोमीटर / तास इतका भन्नाट स्पीड देऊ शकणार आहे.

Advertisement

हे नवीन मॉडेल फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये सादर केलेल्या ४५ संकल्पनेच्या निर्मितीमधील आवृत्ती आहे. या क्रॉसओव्हर मॉडेलमध्ये कंपनीला पॉप अप डोर हँडल्स, रॅक फ्रंट विंडशील्ड, ब्लॅक रूफ, स्लीक एलईडी हेडलॅम्प्ससह २० इंचाचे अ‍ॅलोय व्हील देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहन म्हणून त्यामध्ये सर्वात मोठे आकाराचे चाक आहे. नवीन ह्युंदाई इओनीक ५ मध्ये कंपनीने १२ इंचाची टचस्क्रीन सिस्टम दिली आहे आणि स्टीयरिंग व्हीलच्या मागे गिअर सिलेक्टर देण्यात आलेला आहे.

Advertisement

ही कार दोन बॅटरी पॅक ५८ केडब्ल्यूएच आणि ७२.६ किलोवॅट क्षमतेसह उपलब्ध असेल. हे २०२१ च्या उत्तरार्धात निवडक भागात या कारची विक्री सुरू झालेली असेल. कारच्या दोन्ही बाजूला चार्जिंग पोर्ट असून वेगवान चार्जिंग सिस्टममुळे कारची बॅटरी अवघ्या ५ मिनिटांत चार्ज करून १०० किलोमीटरचा प्रवास करणे शक्य असेल. या फ़क़्त १८ मिनिटांत ही कार बॅटरी ८० टक्के चार्जिंग होईल.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply