Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा भडका : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा, काय आहेत दर

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. लॉकडाउनमुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून लोक अजूनही बाहेर पडलेले नाहीत. अशातच कायम इंधन आणि गॅस दर सातत्याने वाढत आहेत.

Advertisement

आजही गॅसच्या दरात वाढ झालेली आहे. लॉकडाउनपासून गॅसच्या दरात सुरू झालेली वाढ अजूनही थांबलेली नाही. एका बाजूला महागाई आणि बहुतांश क्षेत्रातील मंदीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या भारतीयांना पेट्रोलसह गॅस दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

Advertisement

सिलेंडरच्या दरात फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेला 25 रूपयांची वाढ करण्यात आल्यामुळे 4 फेब्रुवारीला सिलेंडरसाठी तब्बल 719 रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. 50 रूपयांनी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर 769 रूपये सिलेंडरसाठी मोजावे लागत होते. पण आता सिलेंडरसाठी 794 रूपये मोजावे लागणार आहेत.

Advertisement

फेब्रुवारी या एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आता गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशातच तुमच्या खिशावर अजूनच भार पडणार आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply