Take a fresh look at your lifestyle.

फसवणूक झाली, पण नशिबाने दिली साथ; पहा त्यांना कांद्याने कसे केलेय मालामाल

औरंगाबाद / अहमदनगर :

Advertisement

उन्हाळ कांदा बियाणे हे लाल कांदा बियाण्याच्या तुलनेत जास्त महाग आहे. टिकवणक्षमता जास्त असलेला उन्हाळ कांदा बाजारात भावही जास्त खातो. मात्र, उन्हाळी म्हणून लाल कांद्याचे बियाणे देऊन अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यांनाच आता जास्त भाव मिळाल्याने लॉटरी लागल्याचा भास होत आहे.

Advertisement

अनेक दिग्गज आणि नामांकित कंपन्यांचे बनावट बियाणे यंदा उन्हाळ कांदा म्हणून विकण्यात आले. कांद्याला बाजारात दमदार म्हणजे अगदी १०० रुपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सुट्टे किंवा कंपनीचे म्हणून हेच लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले. फसवले गेल्याचे समजल्यावर अनेकांनी कांदे उपटूनही फेकले. तर काहींनी हेच लाल कांदा बियाणे जोपासले. आता त्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला दमदार भाव मिळत आहे.

Advertisement

उन्हाळी कांदा म्हणून लागवड केलेले कांद्याचे बी लाल कांद्याचे निघाल्याने त्याची चर्चा विरत असतानाच आता याच फसवणूक झालेल्या लाल कांद्याच्या बियाण्यांनी शेतकऱ्यांचे आज नशीब पालटवले आहे आणि लाल कांद्याचे विक्रमी उत्पन्न काढून शेतकरी मालामाल होताना दिसत आहेत. त्याचीच चर्चा अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

Advertisement

कांद्याला सध्या ४ ते ४ हजार ५०० रुपये भाव मिळत असल्यामुळे २ लाख रुपये कांद्याचे उपन्न एकरी निघत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही शेतकऱ्यांनी एकरी तब्बल 90 क्विंटल इतकेही उत्पादन निघाल्याचा दावा केला आहे. एकूणच फसवणूक होऊनही नशिबाने साथ दिल्याने शेतकरी मालामाल झालेले आहेत.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply