Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद बँक निवडणूक : २१ जागांसाठी १४८ अर्ज; १० मार्चला चित्र होणार स्पष्ट

औरंगाबाद :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांनी संचालक होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल १४८ जणांनी अर्ज भरले आहेत.

Advertisement

बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी प्रथमच २०५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ५७ अर्ज बाद झालेले आहेत, तर १४८ अर्ज वैध ठरले आहेत. वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना २४ फेब्रुवारी ते १० मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 

Advertisement

अर्ज माघारी घेतल्यावरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शेतकरी नेते संतोष जाधव, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी संचालक वर्षा जगन्नाथ काळे, बाबूराव पवार यांच्यासह एकूण ५७ उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी बाद झालेले आहेत.

Advertisement

अर्ज बाद होण्याची कारणे यासह व्यक्तिगत माहिती पाठवण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितले आहे. एकूणच यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी जोरदार चुरस असणर असेच चित्र आहे.

Advertisement

निवडणुकीच्या रिंगणातील दिग्गज असे :

Advertisement
 • खासदार डॉ. भागवत कराड
 • आमदार सतीश चव्हाण
 • आमदार अंबादास दानवे
 • एकनाथ जाधव
 • आमदार रमेश बोरनारे
 • भाऊसाहेब पाटील
 • कैलास पाथ्रीकर
 • जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे
 • सभापती किशोर बलांडे, कृष्णा डोणगावकर
 •  अॅड. देवयानी डोणगावकर
 •  अप्पासाहेब रामकृष्ण पाटील
 •  मंत्री संदिपान भुमरे
 •  अब्दुल सत्तार
 •  आमदार हरिभाऊ बागडे
 •  रंगनाथ काळे
 •  गोकुळसिंग राजपूत
 •  माजी अध्यक्ष नितीन पाटील
 •  अप्पासाहेब पाटील
 •  जगन्नाथ काळे
 •  पवन डोंगरे
 •  रामदास पालोदकर

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply