Take a fresh look at your lifestyle.

फ़क़्त ४८ महिन्यात १००० पेक्षा जास्त बदल; हतबल व्यावसायिकांनी दिली बंदची हाक

पुणे / औरंगाबाद :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एक महत्वाचा बदल झालेला आहे. तो म्हणजे आधी केले आणि मग गरजेनुसार पुन्हा-पुन्हा बदल केले. पूर्ण धोरण न आखता लोकांना धक्का देण्याच्या नादात नोटबंदी केल्यावर अर्धशतकी बदल केलेल्या ‘एक देश, एक कर’ या जीएसटीमध्येही फ़क़्त ४८ महिन्यात तब्बल एक हजार वेळा बदल केला आहे.

Advertisement

व्यापारी संघटनेने म्हटले आहे की, ‘एक देश, एक टॅक्स, गुड अँड सिंगल्स टॅक्स’चे आम्ही स्वागत केले होते. पण यात दररोज होणारे बदल व जाचक अटी व नियम जीवघेणे ठरू लागले आहेत. कोरोना काळात व्यापार-उद्योग ठप्प झाले होते. उत्पन्न बुडाले याचे भान ठेवून सरकारने अर्थसाहाय्य करण्याएेवजी नवीन कर लादणे सुरू केले. पूर्वसूचना न देता परवाने रद्द करण्यात आले आहेत. अाता दरदिवशी दंडाची रक्कम २० रुपयांवरून ५० रुपयांवर नेली आहे.

Advertisement

करोना कालावधीत व्यावसायिक आणि लहान-मोठ्या कंपन्या संकटात आहेत. अशावेळी सरकारची मदत कमी आणि डोकेदुखी जास्त असेच चित्र निर्माण झालेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे गोडवे गायले आहेत. मात्र, त्यातून कुठेही अच्छे दिन दिसत नसल्याने व्यापारी वैतागले आहेत. म्हणून त्यांनी कायद्यात वारंवार हाेणाऱ्या बदलांविराेधात २६ फेब्रुवारीला बाजारपेठ बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

 सरकार १८% ते २४% जीएसटी वसूल करत आहे.‌ यामुळे व्यापार-उद्योग व्यवसाय करावा की नाही, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. एकतर व्यवसाय संकटात आहेत. त्यात कारचा बोजा वाढत आहे. त्यामुळेच मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रथमच व्यापाऱ्यांनी बंदची हाक देऊन सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

Advertisement

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने ४२ महिन्यांत जीएसटी कायद्यात एक हजार वेळा बदल केले आहेत. याबाबत व्यापारी, उद्योजक, कन्सल्टंट, अकाउंटंट मात्र अनभिज्ञ असतात. या बदलांविषयी जनजागृती करण्याएेवजी सरकार थेट मालमत्ता जप्ती, गुन्हे दाखल करणे, परवाना रद्द करण्याची कारवाई करत अाहे. अाधीच हे भरमसाट कर भरावे लागत असताना अाता मनपानेही परवाना शुल्क कर नव्याने माथी मारला आहे. यामुळे व्यापारी व उद्योजक हैराण झाले अाहेत.

Advertisement

सरकारने कायदे सुलभ केले नाही तर व्यवसाय बंद करण्याच्या मनःस्थितीत अनेक जण आहेत. काहींवर तर आत्महत्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे कायद्यात वारंवार हाेणाऱ्या बदलांविराेधात २६ फेब्रुवारीला बाजारपेठ बंद ठेवणार आहोत, असे काळे यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply