Take a fresh look at your lifestyle.

आता ओटीटी आणि सोशल मीडियावर असणार बंधने; वाचा, काय आहेत सरकारचे नवे नियम

दिल्ली :

Advertisement

अनेकदा ओटीटी आणि सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या चर्चा होत असतात. काही समूह समर्थन करतात तर काही समूह विरोधी भूमिका घेतात. सध्या सत्तेत असलेले भाजप सरकारची भूमिका स्पष्ट असली तरी ती लागू करावी की नाही, याबाबत केंद्र सरकारला अजून स्पष्टता आलेली नाही.

Advertisement

मात्र आता केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

Advertisement

प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी मांडलेले मुद्दे :-

Advertisement
 • सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर 2019 मध्ये काही मार्गदर्शक तत्व मांडली आहेत.
 • पॉर्नोग्राफी, त्यांचा मुलांवर होणारा परिणाम आणि प्रक्षोभक वक्तव्य याबाबत सरकार गंभीर
 • सोशल मीडियावरील अश्लीलतेला आळा घालणार
 • सोशल मीडियावरच्या माहितीची तीन स्तरीय तपासणी
 • सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या तक्रारीसाठी कंपन्यांना स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी लागणार
 • या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा. तक्रारींबाबत 24 तासात कारवाई होणं अपेक्षित
 • महिलाविरोधी पोस्ट 24 तासांत हटवाव्या लागतील.
 • तुमच्या प्लॅटफॉर्मवर काही समाजविघातक असेल तर ते हटवावे लागेल.
 • प्रेस टीव्हीप्रमाणेच सर्व प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मना माध्यमांना काही नियम पाळावे लागतील.
 • OTT प्लॅटफॉर्म्सनी आता सर्व माहिती सरकारला द्यावी.
 • डिजिटल मीडिया पोर्टल्सनीही नियमांचं पालन करावं.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply