Take a fresh look at your lifestyle.

त्यानंतर आली मंत्रालयाला जाग; म्हणून ‘एसईबीसी’ला मिळणार ‘ईडब्ल्यूएस’चे लाभ..!

मुंबई :

Advertisement

मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी याबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्यावर मग कुठे मंत्रालयाला जाग आली आहे. त्यानुसार आता कुठे ‘एसईबीसी’ला ‘ईडब्ल्यूएस’चे लाभ मिळण्याच्या फायली फिरण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

एसईबीसी प्रवर्गातील (सामाजिक व शैक्षणिक मागास) उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे (आर्थिक दुर्बल घटक) लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य सचिव संजयकुमार यांनी सर्व विभागांना बुधवारी खरमरीत पत्र पाठवून याबाबतचा अनुपालन अहवाल दर आठवड्याला पाठवण्याची तंबी दिली आहे.

Advertisement

मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध शासकीय विभाग, मंडळे, महामंडळे, निमशासकीय विभाग, विद्यालये, खासगी शिक्षण संस्था, महाविद्यालये, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा अशा विभागातील शैक्षणिक प्रवेश आणि सरळ सेवा भरतीत एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.

Advertisement

मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी याबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीकडे याचे लक्ष वेधले होते. मंगळवारी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत चव्हाण यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मग कुठे प्रशासनाला याचे महत्व समजले आहे.

Advertisement

चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी प्रशासनाच्या वेळकाढूपणाने विरोधकांना सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मग मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यावर मुख्य सचिव संजयकुमार यांनी अखत्यारीतील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply