Take a fresh look at your lifestyle.

गुंतवणुकीची सुवर्णसंधी : सोने घसरले; वाचा काय आहेत ताजे दर

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे कारण सोन्याचे भाव थेट ४६५०० च्या खाली गेले आहेत.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून घसरण झाली आहे.

Advertisement

आज सोन्याचा भाव ४६४०० रुपयांच्या आसपास असून चांदी ७० हजारांजवळ आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७५० रुपये आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५७५० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६७५० रुपये आहे.

Advertisement

आज सोन्याच्या दरात ३५० रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीमध्ये मात्र तेजी आहे. सध्या चांदीच्या किमतीत २०७ रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव ४९७५० रुपये झाला आहे.

Advertisement

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरला आणि १७९८.७१ डॉलर प्रती औंस झाला. तर चांदीच्या भावात ०.७ टक्के घसरण झाली.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply