Take a fresh look at your lifestyle.

आता ‘त्या’ क्षेत्रातही दबदबा निर्माण करणार मुकेश अंबानी; नव्या क्षेत्रात रिलायन्सची होणार दमदार एंट्री

मुंबई :

Advertisement

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे ज्या ज्या क्षेत्रात उतरले तिथे त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. भविष्यातील व्यवसायाचा अचूक अंदाज घेऊन आता ते एका नव्या क्षेत्रात उतरले आहेत. विशेष बाब म्हणजे आता त्यांनी थेट जगातील सर्वात श्रीमंत माणसाशी टक्कर घेतली आहे.

Advertisement

सध्या ग्रामीणसह शहरी भागात इलेक्ट्रिक मोटारीची चलती आहे. इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक चारचाकी, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक रिक्शा असे अनेक वाहने आता इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहेत. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितले जात आहे. आणि याच क्षेत्रातील भविष्यातला व्यवसाय लक्षात इलेक्ट्रिक मोटारीसाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनात करण्याची तयारी रिलायन्सकडून केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

उद्योजक मुकेश अंबानी यांना इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्र खुणावत असून आता त्यांनी या क्षेत्रात उतरण्याची जंगी तयारी केली आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी लागणाऱ्या बॅटरी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची बाजारपेठ झपाट्याने वाढणार असून, पुढील १० वर्षात ई-बॅटरी उद्योगाची उलाढाल ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

हेच लक्षात घेऊन काळाच्या पुढे पाऊल टाकणारे आणि काळाचा वेध घेणारे अंबानी यांनी या क्षेत्रातील औद्योगिक संधीवर लक्ष केंद्रित केले असून, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात प्रारंभिक टप्प्यात किमान १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply