Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ऑनलाईन नको ऑफलाईनच बरी; झेडपी सदस्यांनी धरला प्रत्यक्ष सभेसाठी आग्रह

अहमदनगर :

Advertisement

करोना कार्यकाळात सगळीकडे निवडणूक सभा आणि धार्मिक कार्यक्रम जोरात असतानाही प्रशासकीय सभा आणि मिटिंग मात्र, ऑनलाईन करायचे नियम लागू आहेत. अशावेळी ऑनलाईन सभेत दहापेक्षा जास्त लॉक एकत्र आल्यास चर्चा कशी होणार हाही मुद्दा आहेच की.. त्यामुळेच आता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष आणि ऑफलाईन घेण्यासाठी सदस्यांनी आग्रह धरला आहे.

Advertisement

याबाबत हर्षदा काकडे यांनी मागणी केली आहे. ऑनलाईन सभेत चर्चा होत नसल्याने सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. अडचणीतून फायदा घेऊन सध्या जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार चालवल्याची चर्चा सुरू आहे. अशावेळी सभा ऑनलाईन घेण्याचा आग्रह प्रशासन आणि सत्ताधारी यांचा आहे.

Advertisement

काकडे यांनी मागणीचे पत्र देताना म्हटले आहे की, कोविडमुळे मागील वर्षभरात प्रत्यक्ष सभा झाली नाही. २६ ला सभागृहात सभा होणार होती, पण नंतर ही सभा गूगल मीटद्वारे घेणार असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा, राज्यसभा, तसेच विधानसभेची अधिवेशने कोविड कालखंडातही झाली आहेत.

Advertisement

त्यामुळे मंगल कार्यालयात किंवा मोकळ्या जागेत सर्व नियम पाळून सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेतल्यास ग्रामीण भागातील विकासकामांना न्याय देता येईल, अशी बहुतांश सदस्यांची भावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply